Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंंबई महापालिका लावणार १ लाख झाडे!

By admin | Updated: June 5, 2016 00:48 IST

मुंबईमधील वृक्षांची तोड होत असताना भविष्याचा विचार करत, मुंबई महापालिकाने जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत एक लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. मुंबईच्या

मुंबई : मुंबईमधील वृक्षांची तोड होत असताना भविष्याचा विचार करत, मुंबई महापालिकाने जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत एक लाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. मुंबईच्या मातीची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन मुंबईत झाडे लावण्यात यावीत, असे आवाहनही महापालिकेने केले आहे आणि तामण, बहावा, करंज, बकुळ, समुद्र फूल, कडुनिंब यासारखी झाडे लावण्यासह गुलमोहर, सोनमोहर, पर्जन्य वृक्ष यासारखी झाडे लावणे शक्यतो टाळण्याचे आवाहन केले आहे.मुंबईतील मातीत रुजेल, वाढेल आणि अधिक घट्ट मूळ धरेल, अशी झाडे लावणे आवश्यक आहे, तर मुंबईच्या मातीत घट्टपणे मूळ धरू न शकणारी झाडे वर्दळीच्या ठिकाणी लावणे शक्यतो टाळणेदेखील आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या उद्यान विभागाने कोणती झाडे लावावीत व कोणती लावू नयेत, याची यादी नुकतीच जाहीर केली आहे. वर उल्लेख केलेल्या झाडांसह गुलमोहर, सोनमोहर, पर्जन्य वृक्ष, जंगली बदाम यांसारखी झाडे वर्दळीच्या ठिकाणी लावणे शक्यतो टाळावे, असे महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)