Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोमटा प्राथमिक आरोग्य केंद्राला १ लाख ३३ हजाराचे वीज बिल

By admin | Updated: June 19, 2015 00:09 IST

सोमटा प्राथमिक आरोग्य केंद्राला मागील तीन वर्षांपासून महावितरण कंपनीने वीज बिल दिले नाही. आता एकत्रित एक लाख ३३ हजार रुपयाचे बिल दिले आहे.

शशिकांत ठाकूर, कासासोमटा प्राथमिक आरोग्य केंद्राला मागील तीन वर्षांपासून महावितरण कंपनीने वीज बिल दिले नाही. आता एकत्रित एक लाख ३३ हजार रुपयाचे बिल दिले आहे. त्यामुळे बिल भरायचे तरी कसे, असा प्रश्न येथील अधिकाऱ्यांना पडला आहे.कासा परिसरात सोमटा प्राथमिक आरोग्य केंद्र हे आदिवासी व दुर्गम भागात असून महामार्गालगत आहे. या केंद्रात रुग्णांची नेहमी गर्दी असतो. मात्र दहा दिवसापूर्वी महावितरणने या केंद्राला दोन वर्षाचे एकदाच १ लाख ३३ हजार ५१० बिल पाठविले असून आठवडाभरात भरण्याची मुदत दिली आहे. महावितरणकडे नियमित वीज बिल देण्याची मागणी येथील अधिकाऱ्यांनी केली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून अधिकाऱ्यांनी एकत्र बिल पाठवून दिले आहे. नियमित बिल नसल्याने आता ते भरायचे कसे असा प्रश्न येथील अधिकाऱ्यांना पडला आहे. विशेष म्हणजे, बिल भरण्यासाठी उशिर झाल्यास येथील वीज पुरवठा खंडित होऊन रुग्णालय व्यवस्था कोडमडेल, अशी भीती अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे येथील बील भरण्यास सूट द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.वीज मंडळाकडे दोन वर्षापासून वीज बिल देण्याची मागणी केली होती. मात्र ते प्राप्त झाले नाही. आता एकदम तीन वर्षाचे थकीत बिल दिल्याने ते भरण्यास अडचण निर्माण झाली आहे.- डॉ. आर. बी. कोकरे, वैद्यकीय अधिकारी, सोमटा