Join us

कुलाब्यात घराचे छत कोसळून १ ठार, ५ जखमी

By admin | Updated: July 12, 2014 13:05 IST

कुलाब्यातील गणेशमुर्तीनगरमध्ये घराचे छत कोसळून १ जण ठार तर ५ जण जखमी झाले आहेत.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १२ - कुलाबा येथे घराचे छत कोसळून १ जण ठार तर ५ जण जखमी झाले आहेत. गणेशमुर्तीनगर येथे शनिवारी सकाळी ही घटना घडली. बांधकाम सुरू असताना हा अपघात घडला असून जखमींना उपचारांसाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.