Join us

अयशस्वी अर्जदारांचे १ कोटी अद्यापही म्हाडाकडेच

By admin | Updated: July 29, 2015 03:29 IST

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) विविध उत्पन्नगटांसाठी बांधलेल्या सदनिकांची सोडत मे महिन्यात काढण्यात आली. या सोडतीमध्ये अयशस्वी ठरलेल्या

मुंबई : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने (म्हाडा) विविध उत्पन्नगटांसाठी बांधलेल्या सदनिकांची सोडत मे महिन्यात काढण्यात आली. या सोडतीमध्ये अयशस्वी ठरलेल्या सुमारे ४३0 अर्जदारांचे अनामत रकमेचे १ कोटी रुपये अद्यापही म्हाडाकडेच जमा आहे.म्हाडाच्या १ हजार ६३ घरांची लॉटरी ३१ मे रोजी काढण्यात आली. या लॉटरीतील विविध भागांतील घरांसाठी सुमारे सव्वा लाख मुंबईकरांनी नशीब अजमावले होते. यामध्ये अयशस्वी ठरलेल्या आणि प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांच्या अनामत रकमेचा परतावा अ‍ॅक्सिस बँकेमार्फत तातडीने अर्जदारांच्या बँक खात्यावर करण्यात आला. परंतु अर्ज भरताना केलेल्या चुकांचा फटका २ हजार ४३0 जणांना बसला. म्हाडाने आवाहन केल्यानंतर अर्जदारांनी म्हाडाकडे आपल्या बँकेची माहिती सादर केल्यानंतर त्यांना त्यांची अनामत रक्कम परत करण्यात आली.परंतु म्हाडाने दिलेल्या ३0 जुलैच्या मुदतीस तीन दिवस शिल्लक असतानाही अयशस्वी अर्जदार म्हाडाकडे संपर्क साधत नसल्याने अनेक चर्चांना ऊत आला आहे.बँकेचा एमआयसीआर क्रमांक, चुकीचा अकाउंट नंबर, एनआरआय अकाउंट नंबर, बंद अकाउंट अशा सहा कारणांमुळे अर्जदारांची अनामत रक्कम ईसीएसमार्फत बँक खात्यात अद्याप जमा झालेली नाही. अशा अयशस्वी अर्जदारांची ईसीएस न होण्याच्या कारणांसह नावांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)