Join us  

१ कोटी ३३ लाख लोकांनी मार्चमध्ये केला विमान प्रवास

By मनोज गडनीस | Published: April 16, 2024 5:24 PM

तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील विमान प्रवाशांच्या संख्येने ३ कोटी ९० लाखांचा टप्पा पार करत नवा विक्रम रचला आहे.

मनोज गडनीस, मुंबई - गेल्या वर्षभरापासून विमान प्रवाशांच्या संख्येत झालेल्या वाढीचा ट्रेन्ड नुकत्याच सरलेल्या मार्च महिन्यातही कायम असल्याचे दिसून आले आहे. मार्च महिन्यामध्ये देशामध्ये एकूण १ कोटी ३३ लाख लोकांनी विमान प्रवास केल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) प्रसिद्ध केली आहे. तर, जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील विमान प्रवाशांच्या संख्येने ३ कोटी ९० लाखांचा टप्पा पार करत नवा विक्रम रचला आहे.

डीजीसीएने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात विमान प्रवास केलेल्या प्रवाशांच्या संख्येत ३.६८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गेल्यावर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत प्रवासी संख्येत झालेली वाढ ४.३८ टक्के अधिक आहे. दरम्यान, या कालावधीमध्ये विमानाच्या विलंबाचा फटका दोन लाख प्रवाशांना बसला. एकूण २३ हजार ६७५ विमान फेऱ्या रद्द झाल्या आहेत. विविध कारणांसाठी एकूण ९४३ प्रवाशांना विमानात प्रवेश नाकारण्यात आला आहे.

टॅग्स :विमानविमानतळ