शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

गोव्याच्या निवृत्त लोकायुक्तांची सुरक्षा काढून घेतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 8:24 PM

लोकायुक्तांनी अलिकडे अनेक महत्त्वाचे निवाडे देत सरकारी गैरव्यवहारांवर कडकपणो बोट ठेवले होते

पणजी : निवृत्त न्यायमूर्ती पी. के. मिश्र हे लोकायुक्त म्हणून निवृत्त झाले व त्याबरोबर सरकारने संधी साधत सोमवारी त्यांची सगळी सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे.लोकायुक्तांना दोन अंगरक्षक सरकारकडून दिले गेले होते. लोकायुक्त जेव्हा कार्यालयात किंवा अन्यत्र कुठे जातात तेव्हा वाहनात त्यांच्यासोबत हे दोघे अंगरक्षक म्हणजे दोघे पोलिस असायचे. त्यांना सरकारने माघारी बोलावले आहे. त्यामुळे ते गेले. तसेच चौघे पोलिस मिश्र यांच्या निवासस्थानी सुरक्षेसाठी असायचे. हे चौघेही एकाचवेळी उपस्थित नसायचे. त्यांना आलटून पालटून निवासस्थानी सुरक्षेच्या डय़ुटीवर पाठवले जात होते. त्या चौघांनाही गृह खात्याने परत बोलावल्याने तेही गेले. मिश्र हे आल्तिनो येथे सरकारी निवासस्थानी राहतात. त्यांच्या सेवेसाठी वाहन असले तरी, त्यांना त्या वाहनाची गरज राहिलेली नाही. कारण कोविडचे संकट वाढत चालल्याने निवृत्तीनंतर निवृत्त लोकायुक्तांनी पूर्णपणो घरीच राहणो पसंत केले आहे. मिश्र हे 73 वर्षीय असल्याने त्यांनी आता घरी देखील कुणाला भेटणे बंद केले आहे. त्यामुळे त्यांना वाहनाची गरज राहिलेली नाही. निवृत्तीनंतर एक महिना लोकायुक्त सरकारी निवासस्थानी राहू शकतात. ते यापुढे आपल्या मूळ गावी म्हणजे ओडीशाला निघून जाणार आहेत. लोकायुक्तांनी अलिकडे अनेक महत्त्वाचे निवाडे देत सरकारी गैरव्यवहारांवर कडकपणो बोट ठेवले. सरकारला ते आवडलेले नाही व त्यामुळे सरकारने सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याची घाई केली अशी चर्चा सचिवालयातही सुरू आहे. मिश्र हे जेव्हा मानवी हक्क आयोगाचे चेअरमन म्हणून निवृत्त झाले होते तेव्हा निवृत्तीनंतरही तीन आठवडे सरकारने मिश्र यांची सुरक्षा व्यवस्था कायम ठेवली होती.