शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

जीवनावश्यक वस्तूंसाठी महापालिकेला; दुपारपर्यंत दोनशेहून अधिक ऑर्डर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 7:14 PM

हेल्पलाईन राहिली कायम व्यस्त

पणजी : ज्येष्ठ व गरजू नागरिकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन वितरण व्यवस्था राबवली. महापालिकेने जाहीर केलेल्या हेल्पलाइनवर सकाळपासून अनेकांचे फोन खणखणले. त्यानुसार दिवसभरात शक्य तेवढा माल लोकांपर्यंत पोचविण्याचे काम मनपाने केले. महापालिका क्षेत्रापुरती ही व्यवस्था करण्यात आली होती.

दुपारी १२ वाजेपर्यंत सुमारे २०० लोकांच्या ऑर्डर्स आल्याची माहिती महापौर उदय मडकईकर यांनी दिली. करंजाळे, रायबंदर भागात ऑर्डरनुसार मालाची दोन वाहने पाठवली . प्रत्येक वाहनावर दहा जणांची नियुक्ती केली आहे. ऑर्डरप्रमाणे सामानाचे पॅकिंग करण्यासाठी २५ ते ३० कर्मचारी वावरत आहेत. ना नफा, ना तोटा या तत्त्वावर ज्येष्ठ नागरिक तसेच गरजू लोकांना आम्ही दैनंदिन जीवनावश्यक वस्तू पुरवीत आहोत, असे मडकईकर यांनी सांगितले. 

ते म्हणाले की, महापालिकेची या सेवेतील भूमिका केवळ डिलिव्हरी बॉयसारखी आहे. वस्तूंची यादी आम्ही जाहीर केली आहे, त्यानुसार पुरेसा माल उपलब्ध करण्यात आला असून गरजू लोकांना तो पुरविला  जाणार आहे. हेल्पलाइनवर सकाळपासून अनेकांचे फोन आले त्यानुसार मालाचा पुरवठा करण्यात आल्याचे मडकईकर म्हणाले. इमारतींमध्ये प्रत्यक्ष सदनिकांपर्यंत आम्ही जात नाही तर इमारतीच्या प्रवेशद्वारावर वाहन ठेवतो. लोकांनी तेथून माल घ्यायचा आहे. या कामासाठी आम्ही कोणतेही डिलिव्हरी शुल्क आकारत नाही. ज्या दराने आम्ही माल विकत घेतलेला आहे, त्याच दराने लोकांना पुरविला जात आहे, असे महापौरांनी सांगितले.

ही आहे हेल्पलाइन!महापालिकेने किराणा मालाच्या डिलिव्हरीसाठी ०८०४७१९१००० क्रमांकाची हेल्पलाइन जाहीर केली आहे. दैनंदिन जीवनातील आवश्यक तांदूळ, मीठ, साखर, तेल, राजमा, मसूर डाळ, तुरडाळ,  मुगडाळ, चहा पावडर, आटा, बटाटा, कांदा, मिरची, टोमॅटो, हळद पावडर, मिरचीपूड, कोथिंबीर पावडर आदी वस्तू घरपोच डिलिव्हरीसाठी उपलब्ध केल्या आहेत.

हेल्पलाइन सतत व्यस्तदरम्यान, काही लोकांनी महापालिकेची हेल्पलाइन सतत व्यस्त होती. फोन केला तरी लागत नव्हता, अशी तक्रार केली.  रायबंदर येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स म्हणाले की, हेल्पलाइनचा क्रमांक कुठल्यातरी बंगळुरूच्या आस्थापनाचा असल्याचे आढळून आल्याचे सांगितले. ते म्हणाले की आपण आयुक्त संजित रॉड्रिग्स यांच्याशी संपर्क साधून हे निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी सांगितले की, केवळ पणजीच नव्हे तर सावर्डे, वास्को आदी ठिकाणहूनही फोन आले आणि त्यामुळे हेल्पलाइन व्यस्त राहिली. सकाळच्या सत्रात हजारो कॉल्स आले आयुक्तांनी सांगितले. पहिले दोन दिवस ऑर्डर घेऊन नंतर पुरवठा करणार आहोत, असे आयुक्तांनी आपल्याला सांगितल्याचे आयरिश संतापजनक स्वरात म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या