Daily Top 2Weekly Top 5

प्राणघातक हल्लाप्रकरणातील दोघांना पाच दिवसाची पोलीस कोठडी

By आप्पा बुवा | Updated: June 7, 2024 20:58 IST

सत्र न्यायालयाकडून पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

फोंडा : धावकोण धारबांदोडा येथील देवेंद्र गावकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी, अटक करण्यात आलेल्या दोघांना, सत्र न्यायालयाकडून पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

सविस्तर वृत्तानुसार बुधवारी देवेंद्र गावकर हा आपल्या घरी झोपलेला असताना पहाटे पाचच्या दरम्यान कांता बेतकेकर व महादेव गावडे यांनी त्याच्या घरात घुसून त्याला बेदम मारहाण केली. सदर मारहाणीत गावकर यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून, कंबर व पायाला गंभीर दुखापत झालेली आहे. त्याच्यावर सध्या गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. या संदर्भात गावकर यांच्या कुटुंबीयांकडून कुळे पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. बुधवारी संपूर्ण दिवस संशयित फरारी होते. गुरुवारी रात्री त्याना अटक करण्यात आली. शुक्रवारी त्यांना जिल्हा सत्र न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार व संशयित आरोपी यांच्यात मागच्या काही वर्षांमध्ये आर्थिक देवाण-घेवाण होत आहे. या देवाण-घेवाण मधूनच त्यांच्यात वाद निर्माण झाला होता. कुळे पोलीस ह्या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :गोवा