शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Coronavirus: दिल्लीचा पर्यटक गोव्यात कोविडग्रस्त आढळला; दिवसभरात १६७ रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 7:44 PM

मंगळवारी राज्यात एकूण २ हजार ४ व्यक्तींच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी १६७ कोविडग्रस्त आढळले.

पणजी : दिल्लीचा पर्यटक मंगळवारी गोव्यात कोविड पोझिटिव्ह आढळला आहे. मिरामार येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये राहणारा हा ४५ वर्षीय तरुण पर्यटक कोविड पोझिटिव्ह असल्याचे चाचणीवेळी निष्पन्न झाले. लक्षणे दिसल्याने त्याने चाचणी करून घेतली. मंगळवारी दोघा स्थानिक नागरिकांचे कोविडने बळी घेतले आहेत.

मडगाव येथील एका ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचे बांबोळीच्या गोमेको इस्पितळात निधन झाले. तसेच आसगाव येथील ५८ वर्षीय पुरुष रुग्णाचाही बळी गेला. आसगावच्या इसमाला म्हापसा येथील आझिलो इस्पितळात मृतावस्थेतच आणले गेले होते. शवचिकित्सा करण्यापूर्वी  चाचणीवेळी तो कोविड पोझिटिव्ह आढळून आला. त्याला कोविडची लक्षणे दिसत नव्हती, असे त्याच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, मंगळवारी राज्यात एकूण २ हजार ४ व्यक्तींच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यावेळी १६७ कोविडग्रस्त आढळले.  राज्यातील एकूण बळींची संख्या ६७९ झाली आहे. सध्या १ हजार २२१ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या चोवीस तासांत ८५ कोविड रुग्ण आजारातून बरे झाले.

दरम्यान, गोव्यात जे पर्यटक येतात, त्यांनी गोव्यात फिरताना मास्कचा वापर करावा. पाट्यार्ंमध्ये सहभागी होताना किंवा क्लब किंवा रेस्टोरंटमध्ये जाताना मास्क वापरावे असा सल्ला सरकारने दिला आहे. मास्क न वापरणाऱ्या पर्यटकांना दंडही ठोठावला जात आहे. होटेलांनी काही खोल्या कोविडग्रस्तांसाठी आरक्षित कराव्यात अशी सूचना नुकतीच आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी केली आहे. दिल्लीहून गोव्यात येणाऱ््या पर्यटकांसाठी गोवा सरकार यापुढे वेगळी एसओपीही आणू शकते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या