शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

इफ्फीत गोमंतकीयांना सामोरे जावे लागणार हे जावडेकरांनी ध्यानात ठेवावे; काँग्रेसचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 9:38 PM

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचाही ताबा असल्याचे तसेच काही दिवसात गोव्यात होणाऱ्या इफ्फीच्यावेळी गोमंतकीयांना त्यांना सामोरे जावे लागणार असल्याचे ध्यानात ठेवावे.

पणजी : कळसा भंडुरा प्रकल्पाला ईसी देणारे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्याकडे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाचाही ताबा असल्याचे तसेच काही दिवसात गोव्यात होणाऱ्या इफ्फीच्यावेळी गोमंतकीयांना त्यांना सामोरे जावे लागणार असल्याचे ध्यानात ठेवावे. शांत गोमंतकीयांच्या उद्रेकास सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, गोव्याच्या हिताविरुद्ध कट कारस्थाने करणा-या भाजपच्या केंद्रीय मंत्र्याना गोव्यात प्रवेश बंद करण्यास गोवेकर मागेपुढे पाहणार नाहीत, असा इशारा प्रदेश काँग्रेसने दिला आहे.प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणतात की, म्हादईच्या विषयावर कर्नाटकाच्या बाजूने झुकते घेत पक्षपातीपणा दाखवणा-या जावडेकरांनी थोड्याच दिवसात इफ्फीच्या निमित्ताने गोवेकरांचा सामना करावा लागेल. गोव्याची जीवनदायिनी म्हादईचे रक्षण करण्यास कॉंग्रेस वचनबध्द असून म्हादईला हिरावून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रखर विरोध करण्यास सदैव तत्पर आहोत. चोडणकर म्हणतात की, यापूर्वी गोवा मुक्तीलढा, ५० टक्के बस तिकीट सवलत व इतर विद्यार्थी आंदोलने, राजभाषा आंदोलन तसेच इतर आंदोलनातून गोमंतकीयांच्या एकीचे दर्शन घडले आहे. गोमंतकीयांनी नेहमीच विजयश्रीच मिळवली आहे, याची माहिती मुख्यमंत्री सावंत यानी जावडेकरांना द्यावी.जावडेकरांचे ट्विट खोटे होते काय?, आमदार विजय सरदेसाईंचा खडा सवालकळसा भंडुराला केंद्राने ईसी दिलीच नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्यानंतर आमदार विजय सरदेसाई यांनी तर मग केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यासंबंधी जी व्टीट केले ते खोटे होते काय? असा सवाल केला आहे. जावडेकरांनी ईसीसंबंधी केलेले ट्विट आणि त्यानंतर मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उत्तरादाखल मानलेले धन्यवाद हे सर्व खोटे होते, असे मुख्यमंत्र्यांना म्हणायचे आहे का, असा प्रश्न सरदेसाई यांनी केला आहे. सरदेसाई यांनी व्टीेटरवर जावडेकरांच्या व्टीटचा स्क्रीनशॉटही टाकला आहे. जावडेकर यांनी स्वत:चे ट्विट नंतर काढून टाकले होते.