शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

घरावर दरड कोसळल्याने ६५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 7:14 PM

वृद्ध महिलेचा ३५ वर्षीय मुलगा सुखरूप बचावला

वास्को: सोमवारी (दि.२१) रात्री ११ वाजता गोवा शिपयार्ड समोरील अंतर्गत रस्त्याच्या आत असलेल्या एका घरावर दरड कोसळून घराचा मोठा भाग जमिनदोस्त होण्याबरोबरच दरडी खाली चिरडून येथे राहणाऱ्या ६५ वर्षीय अनिता बोरकर या वृद्ध महिलेचा दुर्देवी अंत झाला. दरड कोसळण्याच्या घटनेवेळी अनिता व तिचा ३५ वर्षीय मुलगा अजित घरात झोपले असून सुदैवाने याघटनेतून तो मात्र सुखरूप बचावला. या परिसरातील डोंगराळ भागातून आणखीन दरड कोसळण्याची भिती येथे राहणाºया नागरिकात व्यक्त केली जात असून भविष्यात आणखीन अनर्थ होण्यापूर्वीच प्रशासनाने लोकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उचित पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी होत आहे. 

सोमवारी सतत पडत असलेल्या मूसळधार पावसाच्या दरम्यान ही घटना घडली. गोवा शिपयार्ड समोरील अंतर्गत रस्त्याच्या आत असलेल्या एका घरात अनिता बोरकर व तिचा ३५ वर्षीय मुलगा अजित बोरकर राहत असून याच घराच्या दुसºया बाजूने त्यांचे अन्य नातेवाईक राहतात. अतिना व अजित राहत असलेल्या घराच्या बाहेरील परिसरात डोंगराळ भाग आहे. सोमवारी रात्री अजित घरात खाटेवर तर त्याची आई खाली झोपली होती. आई - मुलगा आपल्या घरात गाढ झोपले असता रात्री ११ च्या सुमारास भयंकर असा आवाज होऊन डोंगराळ भागातून मोठी दरड कोसळून तीन भले मोठे दगड तसेच मोठ्या प्रमाणात माती खाली उतरली. यापैंकी एक दगड जवळच असलेल्या विहरी जवळ तर दुसरा दगड येथेच असलेल्या अन्य एका घरासमोर कोसळला. तिसरा भला मोठा दगड अनिता बोरकर यांच्या घराचा जास्तित जास्त भाग जमिनदोस्त करीत घराचे छप्पर, भिंती पाडून आत शिरला. आपल्या घरावर दरड कोसळत असल्याची जाणीव अजित ला होताच त्याने उठून आपल्यासहीत आईला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत घरावर दरड कोसळली होती. अजितने आपल्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्याला ती सापडली नाही. दरड कोसळल्याने अजित व त्याची आई आत अडकल्याचे येथे राहणाºया लोकांना समजताच त्यांनी त्याला त्वरित घरातून सुखरूप बाहेर काढले. तसेच त्यांनी अनिता हीचा शोध घेतला, मात्र त्यांना ती सापडली नाही. घरावर दरड कोसळून त्याच्या खाली महीला चिरडली असल्याची माहीती वास्को अग्निशामक दलाला मिळताच रात्री ११.१५ च्या सुमारास त्यांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन बचाव कार्याला सुरवात केली. अग्निशामक दलाने घराच्या पुढच्या बाजूची (जेथे दुसरे कुटूंब राहत होते) भिंत फोडून आत जाऊन अनिताचा शोध घेण्यास सुरवात केली, मात्र त्यांना ती सुरवातीला सापडली नाही. अनिता ही वृद्ध महीला दरडीखाली सापडल्याची जाणीव अग्निशामक दलाला झाल्यानंतर त्यांनी घरात शिरलेला भलामोठा दगड फोडण्यासाठी तसेच जमिनदोस्त झालेला घराचा भाग व दरडी हटवण्यासाठी यंत्र तसेच मुरगाव नगरपालिकेच्या कामगारांची मदत घेऊन अनिता या महीलेचा शोध घेण्यास सुरवात केली. ११.१५ वाजता दरडीखाली सापडलेल्या अनिता हीचा शोध घेण्याला सुरवात केल्यानंतर सुमारे चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर रात्री ३.१५ च्या सुमारास अग्निशामक दलाच्या जवानांना अनिताचा मृतदेह सापडला. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार अनिताचा मृतदेह पोटाच्या बाजूने पडला असून दरड कोसळण्याची जाणीव झाल्याने कदाचित तीने स्व:ताला वाचवण्यासाठी प्रयत्न केले असावे, मात्र दुर्देवाने तो पर्यंत उशिर झाला असावा. दरड कोसळून त्याच्याखाली सापडलेल्या अनिता हीला तेथून बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाला वास्को पोलीस अधिकारी व शिपायांची मदत लाभली अशी माहीती सूत्रांनी दिली. ६५ वर्षीय अनिताचा मृतदेह सापडल्यानंतर पोलीसांनी तिच्या मृतदेहाचा पंचनामा करून नंतर पहाटे ४.३० च्या सुमारास तो शवगृहात पाठवून दिला. दुर्देवी रित्या मरण पोचलेल्या अनिताच्या मृतदेहावर शवचिकित्सा केल्यानंतर मंगळवारी तिचा मृतदेह कुटूंबाच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर तिच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आल्याची माहीती सूत्रांनी दिली. मागच्या तीन ते चार वर्षापासून पावसाळ्यात येथे दरड कोसळण्याचा प्रकार घडत असल्याची माहीती सूत्रांनी देऊन सोमवारी रात्री दरड कोसळून अनिता या वृद्ध महीलेचा मृत्यू झाल्याने याभागात राहणाºया नागरिकात दरड कोसळण्याच्या विषयावरून चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. या परिसरातील डोंगरावरून आणखीन दरड कोसळण्याची भिती लोकात व्यक्त केली जात असून भविष्यात आणखीन कुठला अनर्थ घडण्यापूर्वी प्रशासनाने येथे राहणाऱ्या नागरिकाच्या हीतासाठी उचित पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी होत आहे. दरड कोसळून मरण पोचलेली अनिता आपल्या मुलासहीत राहत असून तिला तीन विविहीत मुली आहेत. काही वर्षापूर्वी तिच्या पतीचे तसेच एका मुलाचे निधन झाल्याची माहीती तिच्या परिचयाच्यांकडून प्राप्त झाली.