महाराष्ट्राची लेक नेपाळची सून आहे. प्राजक्ताने बॉयफ्रेंड वृषांक कनाल याच्यासोबत संसार थाटला आहे.
प्राजक्ता कोळी हे सोशल मीडियावरील लोकप्रिय नाव आहे. प्राजक्ता एक प्रसिद्ध युट्यूबर आहे.
प्राजक्ताने काही महिन्यांपूर्वीच लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
ही महाराष्ट्राची लेक नेपाळची सून आहे. प्राजक्ताने बॉयफ्रेंड वृषांक कनाल याच्यासोबत संसार थाटला आहे.
वृषांक हा मुळचा नेपाळमधील काठमांडू येथील असून त्याने डी. व्हाय. पाटीलमधून वकिलीचं शिक्षण घेतलं आहे.
सध्या नेपाळमध्ये राजकीय उलथापालथ सुरू आहे. सरकारविरोधात तरुणाई रस्त्यावर उतरली आहे.
ही सर्व परिस्थिती पाहता प्राजक्ताने तिची नेपाळ ट्रिप रद्द केली आहे.
नेपाळमध्ये जे घडलं ते खरोखरच हृदयद्रावक असल्याचं तिने म्हटलं आहे.