अभिनेत्री हिना खान हा हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा आहे.
छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून हिना खान घराघरात पोहोचली.
अगदी अल्पावधीतच तिने इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं.
सध्या सोशल मीडियावर हिना खानची तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चा होत आहे.
नुकतेच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमधील हिनाची स्टाईल आणि फॅशन सेन्सचं चाहत्यांनी कौतुक केलंय.
सध्या सगळीकडे अभिनेत्रीच्या निळ्या रंगाच्या आऊटफिटमधील ग्लॅमरस लूकची चर्चा होत आहे.