'त्या' एका कृतीमुळे यामी गौतम आदित्य धरच्या पडली प्रेमात! 

अशी सुरु झालेली लव्हस्टोरी!

दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर: द रिव्हेंज' सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट असून अवघ्या ८ दिवसांत १००० कोटींची कमाई केली आहे.

यातच आदित्य धरच्या वैयक्तिक आयुष्यातील 'लेडी लक' म्हणजेच अभिनेत्री यामी गौतम हिच्यासोबतच्या लव्ह स्टोरीची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

आदित्य धरने 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने बाजी मारली. याच चित्रपटात यामी गौतम महत्त्वपूर्ण भूमिकेत होती. 

शूटिंगदरम्यान आदित्यचा शांत स्वभाव, कोणावरही न ओरडता काम करण्याची पद्धत आणि साधेपणा यामीच्या मनाला भावला. आदित्यचे जमिनीवर असलेले पाय पाहून यामी त्याच्या प्रेमात पडली.

 'उरी'च्या प्रमोशनदरम्यान त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली आणि दोघांनाही जाणीव झाली की आपल्याला आयुष्यभर एकत्र राहायचे आहे.

 विशेष म्हणजे, दोघांच्या घरच्यांनीही या नात्याला त्वरित होकार दिला. २०२१ मध्ये यामी आणि आदित्यने अत्यंत गुपचूप पद्धतीने लग्न उरकून सर्वांना धक्का दिला

हिमाचल प्रदेशमध्ये निसर्गाच्या सानिध्यात पार पडलेल्या या सोहळ्यात केवळ २० जवळचे लोक उपस्थित होते.

आदित्य आणि यामी यांना एक मुलगादेखली आहे. त्याचे नाव 'वेदविद' असे आहे. 

Click Here