दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर सध्या ‘वॉर-२' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर एनटीआरने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे.
चाहत्यांमध्ये ज्यु.एनटीआर या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या अभिनेत्याचं खरं नाव तुम्हाला माहिती आहे का?
ज्युनिआर एनटीआरचं खरं नाव ‘तारक’ (नंदमुरी तारक रामा राव) आहे.
ज्युनिअर एनटीआर हा आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य सुपरस्टार एनटी. रामाराव यांचा नातू आहे.
बालकलाकार म्हणून त्याने फिल्मी करिअरची सुरूवात केली. एन.टी. रामा राव यांच्या चित्रपटातून त्याने कलाविश्वात पदार्पण केलं.
एनटी. रामा राव यांचा नातू असल्यामुळे लोक त्याला ज्युनिअर एनटीआर याच नावाने ओळखू लागले.
पुढे जगभरात याच नावाने त्याला ओळख मिळाली.