लग्नानंतर अक्षया आणि विशालने रोमँटिक फोटोशूट केलं आहे. याचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत.
विशाल निकम-अक्षया हिंदळकर नुकतेच लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.
या फोटोंमध्ये विशाल-अक्षयाची केमिस्ट्री दिसत असून त्यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
विशाल-अक्षयाची जोडी चाहत्यांची फेव्हरेट आहे. या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
विशालने सोशल मीडियावरुन अक्षयावरच्या प्रेमाची कबुली दिली होती.
त्यानंतर १० फेब्रुवारीला उत्तराखंडमधील त्रियुगीनारायण मंदिरात त्यांनी लग्नगाठ बांधली.