नवरात्रीच्या नवरंगांची विद्या बालनलाही भुरळ!
शारदीय नवरात्रोत्सवाला कालपासून (२२ सप्टेंबर) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.
नवरात्रीच्या नवरंगांची अभिनेत्री विद्या बालनलाही भुरळ पडली आहे.
विद्यानं नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा खास लूक चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
आजचा रंग लाल असल्यानं विद्यानं सुंदर फोटोशूट केले आहे.
लाल रंगाच्या साडीत ती अतिशय आकर्षक आणि देखणी दिसत आहे.
तसेच काल २१ सप्टेंबर रोजी नवरात्रीच्या पहिल्या दिवशीचा शुभ रंग पांढरा होता. तर विद्याने काल पारंपरिक पांढरी साडी नेसली होती.
सोन्याच्या काठाची पांढरी साडी आणि आकर्षक दागिने तिने परिधान केले होते.
साडीमधील तिचा लूक नेहमीच खास राहिला आहे. त्यामुळे नवरात्रीच्या निमित्ताने पुन्हा एकदा तिच्या लूकची चर्चा रंगली आहे.