नवरात्रीच्या पाचव्या दिवशी हिरव्या रंगाच्या साडीत मनमोहक फोटोशूट
अभिनेत्री विद्या बालन हिनं नवरात्रीच्या पाचव्या दिवशीचा तिचा खास लूक चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
हिरव्या रंगाच्या पारंपरिक पैठणी साडीत सजलेली विद्या बालन अतिशय देखणी दिसत आहे.
पैठणी नेसून, केसात गजरा माळून ती छान तयार झाल्याचं पाहायला मिळालं.
विद्याने केलेला हा साजिरा लूक चाहत्यांना पसंत पडला आहे.
विद्याचा साडीमधील लूक नेहमीच खास राहिला आहे.
विद्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिचे वेगवेगळे साडीतील लूक शेअर करत असते.
त्यामुळे नवरात्रीच्या निमित्ताने पुन्हा एकदा तिच्या लूकची चर्चा रंगली आहे.
विद्या फॅशनची फॅन नाही. अमुक एक फॅशन तिने कधीच फॉलो केलेली नाही. जी गोष्ट तिला भावते, जी आवडते, तीच तिच्यासाठी स्टाईल असते.