छोट्या रमाच्या भूमिकेत तेजश्री वालावलकर प्रेक्षकांना आवडली होती.
'उंच माझा झोका' ही छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका. या मालिकेत छोट्या रमाची भूमिका साकारून तेजश्री घराघरात पोहोचली.
मात्र आता ही छोटी रमा मोठी झाली असून तिच्याच खूप बदलही झाल्याचं पाहायला मिळतंय.
तेजश्री सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं. अनेकदा ती तिचे फोटो शेअर करत असते.
आता तेजश्रीने वेस्टर्न लूकमध्ये फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
छोट्या रमाचा बदललेला लूक पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.