'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत वहिनीसाहेब ही भूमिका साकारून अभिनेत्री धनश्री काडगांवकर घराघरात पोहोचली.
धनश्रीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतंच तिने हिरव्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलं आहे.
खड्यांचे दागिने घालून अभिनेत्रीने सुंदर लूक केला आहे.
केसांत गुलाबाची फुलं माळल्याने अभिनेत्रीच्या सौंदर्यात भर पडली आहे.
धनश्रीचे हे फोटो चाहत्यांच्याही पसंतीस उतरले आहेत.