६ ऑस्कर नामांकनं मिळवणारा 'हा' चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंग
जबरदस्त थरार, क्लायमॅक्स पाहून तुम्ही थक्क व्हाल
हॉरर चित्रपटांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
सध्या एक हॉरर चित्रपट ओटीटीवर ट्रेंड होत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाला ६ ऑस्कर नामांकनं मिळाली होती.
ज्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट संपादन यांचा समावेश होता.
या चित्रपटाला IMDB वर ८.२ रेटिंग मिळाले आहे.
'द सिक्स्थ सेन्स' असं या चित्रपटाचं नाव आहे. ब्रूस विलिस आणि हेली जोएल ओसमेट यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात आहेत.
हा चित्रपट एका अशा मुलाची कथा सांगतो, ज्याला मेलेली माणसं दिसतात. 'द सिक्स्थ सेन्स' चित्रपटाचा क्लायमॅक्स प्रेक्षकांना थक्क करतो.
'द सिक्स्थ सेन्स' हा चित्रपट १९९९ मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.
१ तास ४७ मिनिटांचा हा भयपट तुम्ही घरबसल्या अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.