'ठरलं तर मग'ची खलनायिका प्रियानं शेअर केले खास फोटो
टीआरपीच्या शर्यतीत अव्वल क्रमांकावर असलेल्या 'ठरलं तर मग' या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
मालिकेतील सायली असो किंवा प्रिया, प्रत्येक पात्राची चर्चा सोशल मीडियावर होत असते.
'ठरलं तर मग'मधील प्रिया ही खलनायिकेची भूमिका अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर साकारतेय.
प्रियांका तेंडोलकर नुकतीच व्यग्र शेड्युलमधून ब्रेक घेऊन राजस्थान फिरायला गेली.
आपल्या ट्रीपचे फोटो तिनं सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
प्रियांकाने या फोटोंना "राजस्थानमधील सुंदर Selfies" असं कॅप्शन दिलं आहे.
तिने राजस्थानमधील प्रसिद्ध राजवाड्यांनाही भेट दिली.
अभिनेत्रीच्या राजस्थान सफरनाम्याचे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.