जुईने पोस्टमधून तिचं वय किती हे सांगितलं आहे.
जुई गडकरी हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'पुढचं पाऊल' मधून तिला प्रसिद्धी मिळाली.
नुकताच जुईचा वाढदिवस झाला. वाढदिवशी जुईला मालिकेच्या सेटवरही खास सरप्राइज मिळालं.
जुईने तिच्या सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत चाहत्यांना थँक्यू म्हटलं आहे.
यासोबतच जुईने तिच्या वयाबद्दलही खुलासा केला आहे. जुई ३८ वर्षांची झाली आहे.
पण, तिचे हे फोटो बघून मात्र चाहत्यांचा यावर विश्वास बसत नाहीये.
अगदी साधी आणि तितकीच सुंदर दिसणारी जुई चाहत्यांना तिच्या सौंदर्याने भुरळ घालते.
जुई सध्या 'ठरलं तर मग' मालिकेत सायलीची भूमिका साकारत आहे.