जुईने स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला होता.
जुई गडकरी ही मराठी टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री. 'पुढचं पाऊल'मुळे ती घराघरात पोहोचली.
सध्या जुई 'ठरलं तर मग' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
निळ्या रंगाच्या स्लिट ड्रेसमध्ये जुईने फॅशन केली होती. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
जुईचा हा लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरल्याचं दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.