'कुन्या राजाची गं तू राणी' या मालिकेतून शर्वरी जोग हे नाव घराघरात पोहोचलं.
या मालिकेत तिने साकारलेली 'गुंजा' आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
सध्या शर्वरी जोग 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत ईश्वरी देसाई नावाची व्यक्तिरेखा साकारते आहे.
शर्वरी सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. त्याद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नुकतंच अभिनेत्री क्लासी फोटोशूट केलं आहे. ज्याची सगळीकडे चर्चा होत आहे.
या फोटोंमध्ये शर्वरी पुस्तक वाचताना दिसते आहे. तिचं हे फोटोशूट चाहत्यांना आवडलं आहे.
"ए री सखी...", असं कॅप्शन शर्वरीने या फोटोंना दिलं आहे.