छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे रूपाली भोसले.
सध्या रुपाली स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लंपडाव' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करते आहे.
या मालिकेत ती सरकार अर्थात तेजस्विनी कामत नावाची मुख्य भूमिका साकारते आहे.
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
रुपालीने केशरी रंगाची सिल्क साडी परिधान रॉयल अंदाजात हे फोटोशूट केलं आहे.
या लूकला साजेसा सुंदर नेकलेस तसंच केसात माळून तिने साजशृंगार केला आहे.
रुपालीचं हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांना तिचा हा हटके लूक खूप आवडला आहे.