मराठमोळी, थोडीशी साधी भोळी...!

साक्षी गांधी ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

साक्षी गांधी 'सहकुटुंब सहपरिवार' मालिकेत अवनीची भूमिका साकारुन घराघरात पोहोचली.

उत्तम अभिनय आणि सौंदर्याच्या बळावर साक्षीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

सध्या साक्षी 'कोण होतीस तू काय झालीस तू' मालिकेत काम करताना दिसते आहे. 

या मलिकेत ती यमुना धर्माधिकारी नावाचं पात्र साकारते आहे.

नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे पारंपरिक अंदाजातील खास फोटो शेअर केले आहेत.

जांभळ्या रंगाची नऊवारी साडी त्यावर मोत्यांचे दागिने परिधान करुन साक्षीने साजशृंगार केला आहे. 

अभिनेत्रीचा हा मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.



तुझ्या रंगी सांज रंगली...! 

Click Here