ये लाल इश्क...! 

तमन्ना भाटियाचं मनमोहक फोटोशूट

अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या सौंदर्याची कायम चर्चा होत असते. दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेसृष्टीत ती आघाडीवर आहे.

 नुकतंच तमन्ना भाटियाने सुंदर फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

तमन्नाने लाल रंगाचा एक 'मॉडर्न लेहेंगा' परिधान करून आपल्या सौंदर्याची मोहिनी घातली आहे.

आपला हा लूक अधिक उठावदार करण्यासाठी तिने गळ्यात हिरव्या पाचूचा एक भरगच्च असा 'स्टेटमेंट चोकर' नेकलेस घातला.

लाल रंगाच्या या ड्रेसवर हिरव्या रंगाचे हे दागिने अतिशय देखणे दिसत आहेत.

तमन्ना या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. तिच्या या लूकवरून नजर हटत नाही.

अभिनेत्रीचं हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.

तमन्नाने अलीकडच्या काळात 'स्त्री २' मधील 'आज की रात' आणि 'जेलर' मधील 'कावला' या गाण्यांमधून प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

Click Here