स्वानंदीचा नवरा आहे तरी कोण,तो काय करतो?

स्वानंदी सरदेसाई हिच्या नवऱ्याचे खरे नाव काय? तो काय करतो?

दशावतार फेम, लोकप्रिय युट्यूबर आणि गायिका असलेली स्वानंदी सरदेसाई हिने अलीकडेच विवाहबद्ध झाल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. 

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर लग्नगाठ बांधत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरुन लग्नाचा फोटो पोस्ट केले आहेत.

 स्वानंदीने विक्रांत रामदास याच्यासोबत सप्तपदी घेत वैवाहिक जीवनाला सुरुवात केली आहे. इन्स्टाग्रामवरुन गायिकेने पतीसोबतचा फोटो शेअर केला आहे.

स्वानंदी सरदेसाई हिचा नवरा कोण आहे, तो काय करतो? हे जाणून घेण्याची सगळ्यानाच उत्सुकता लागून राहिलेली आहे.

स्वानंदी सरदेसाई हिच्या नवऱ्याचे नाव विक्रांत रामदास बदरखे असे आहे. विक्रांत हा नाट्य दिग्दर्शक, अभिनेता आणि लेखक आहे.

मूळचा अकोल्याचा असलेल्या विक्रांत हा MPSC करण्यासाठी पुण्यात आला. अभ्यासही जोरदार सुरू असतानाच त्याला नाटकाची त्यांना ओढ लागली.

विक्रांतने नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. स्वानंदी आणि विक्रांत यांची ओळख याच माध्यमातून झाली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

स्वानंदी सरदेसाई सोशल मिडिया चॅनेलवर कोकणातील ग्रामीण जीवन, नैसर्गिक आणि दैनंदिन आयुष्यातील व्हिडिओ शेअर करत असते.

Click Here