गायकाने स्थळ नाकारण्यामागचं कारणही खूपच इंटरेस्टिंग आहे
माधुरी दीक्षित म्हणजे अनेकांच्या हृदयाची धडकन आहे. तिला धकधक गर्ल म्हणून ओळखलं जातं.
माधुरीने 'तेजाब','खलनायक','बेटा' अशा एकापेक्षा एक सिनेमांमधून यश मिळवलं
मात्र तिचं सिनेमात काम करणं वडिलांना पटत नव्हतं. तिने वेळेत लग्न करावं असंच त्यांना वाटत होतं.
म्हणून माधुरीचे वडील गायक सुरेश वाडकर यांच्याकडे तिचं स्थळ घेऊन गेले होते.
तेव्हा सुरेश वाडकर हळूहळू संगीत क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करत होते. तसंच दोघांमध्ये १२ वर्षांचं अंतर होतं.
मुलगी खूप बारीक आहे असं कारण सांगत तेव्हा सुरेश वाडकरांनी माधुरीच्या वडिलांना नकार दिला होता.
नंतर माधुरीच्या अनेक चित्रपटांमध्ये सुरेश वाडकरांनीही गाणी गायली आहेत. मात्र दोघांचा हा किस्साही नंतर खूप चर्चेत होता.