अप्सरा हो तुम...    या कोई परी...

शाहरूखची लेक सुहाना खानचा दिवाळी स्पेशल लूक

सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू आहे. शाहरूख खानची लेक सुहाना खान हिनेदेखील दिवाळीसाठी खास लूकमधील फोटो पोस्ट केलेत.

सुहानाच्या फोटोंमध्ये दिसणारा लूक अत्यंत देखणा आणि राजेशाही आहे. तिने परिधान केलेला लेहंगा-चोली ही पारंपरिक वेशभूषा आहे.

सुहानाच्या लेहंगा-चोलीमध्ये लाल, सोनेरी आणि हिरव्या रंगांचा सुंदर संगम आहे. चोलीवर मिररवर्क, झरी आणि मणीचे नक्षीकाम केले आहे.

डीपनेक डिझाईन या पोशाखाला अधिक आकर्षक बनवतो. लेहंग्यावरही पारंपरिक राजस्थानी-गुजराती पॅटर्नमध्ये भरजरी भरतकाम केले आहे.

मेकअप नैसर्गिक आणि हलक्या चमकदार बेससह करण्यात आला आहे. डोळ्यांवर सौम्य शेड्स, हलकी आयलाइनर आणि आयब्रोस्टाइल केलेली आहे.

लेहंगा-चोली आणि इतर बेसिक मेकअपला परिपूर्ण करण्यासाठी ओठांवर हलकी गुलाबी न्यूड लिपस्टिक लावून लूकचे सौंदर्य संतुलित केलेय.

ज्वेलरीमध्ये सोनेरी मांगटिक्का, रंगीत स्टोन्सचे झुमके, सोनेरी बांगड्या आणि एक स्टेटमेंट रिंग असा पारंपरिक लूक करण्यात आलाय.

सुहानाचा हा संपूर्ण लूक फेस्टीव्ह वाईब्सना मॅच करण्याच्या दृष्टीने उत्तम जमून आला आहे. भारतीय संस्कृती आणि आधुनिकतेचा सुंदर संगम यात दिसून येतो.

प्राजक्ता माळीचा स्पेशल
दिवाळी लूक पाहिलात का?

Click Here