सोनालीने करोना काळात लॉकडाऊनमध्ये कुणाल बेनोडेकर लग्नगाठ बांधली होती.
मराठी चित्रपटसृष्टीची 'अप्सरा' अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सिनेमात विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
सध्या सोनाली ही तिचा पती कुणाल बेनोडेकरसोबत छान वेळ घालवताना दिसत आहे.
सोनालीने नवऱ्यासोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
हे फोटो शेअर करताना "तुझ्या-माझ्या ओळखीला ८ वर्ष पुर्ण झाली" असे कॅप्शन तिने दिले आहे.
सोनालीने शेअर केलेले या फोटोंवर अनेक चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट केल्या आहेत.
सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांनी ७ मे २०२१ मध्ये दुबईमध्ये रजिस्टर लग्न केलं होतं.
कोरोनामुळे कोणतीही हौस करता आली नाही म्हणून सोनाली आणि कुणाल यांनी लग्नाच्या वाढदिवशी लंडन येथे पुन्हा लग्नगाठ बांधली.