सोनाली कुलकर्णीच्या फोटोशूटने वेधले चाहत्यांचे लक्ष!
मराठी चित्रपटसृष्टीची 'अप्सरा' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच आपल्या फॅशन सेन्स आणि स्टायलिश लूकमुळे चर्चेत असते.
नुकताच सोनालीने सोशल मीडियावर एक खास फोटोशूट शेअर केले आहे.
सोनाली कुलकर्णीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाची बनारसी सिल्क साडी नेसली आहे.
या साडीतील तिचा मनमोहक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
सोनालीने या साडीवर मॅचिंग ज्वेलरी परिधान केली.
चित्रपट असो वा सोशल मीडिया, सोनाली कुलकर्णी नेहमीच विविध फॅशन ट्रेंड्समध्ये प्रयोग करत असते.
तिने पारंपरिक लूकला आधुनिकतेची जोड देत नेहमीच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या निळ्या बनारसी साडीतील तिच्या या लूकने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की ती खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टीची 'फॅशन आयकॉन' आहे.