अभिनेत्रीची ॲपल स्टोअरच्या उदघाटनाला खास उपस्थिती!
पुण्यातील पहिल्या ॲपल स्टोअरच्या उद्घाटन समारंभात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हजेरी लावली होती.
याचे फोटो तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
"पुण्यामध्ये आपलं स्वागत आहे ॲपल, ॲपलमध्ये तुमचं स्वागत आहे पुणे, ", असं कॅप्शन तिनं फोटोंना दिलं.
यावेळी ती निळ्या रंगाच्या गाऊनमध्ये ग्लॅमरस दिसली.
उद्घाटनावेळी अभिनेत्रीने खास क्षण कॅमेऱ्यात कैद करून घेतले.
ॲपल स्टोअरच्या उद्घाटन सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारही उपस्थित होते.
पुण्यातील कोरेगाव पार्क येथे हे ॲपल स्टोअर सुरू झाले आहे.
सोनालीनं शेअर केलेले हे फोटो सध्या चर्चेत आलेत.