स्नेहलता वसईकर आणि अभिनेता अशोक फळदेसाई यांनी नुकतंच शिर्डीतील साईबाबांचं दर्शन घेतलं.
स्नेहलता वसईकर आणि अशोक हे अलिकडेच सन मराठीवर सुरू झालेल्या 'तुझ्यासाठी तुझ्यासंग' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
स्नेहलता आणि अशोकने शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर या देवस्थानांना भेट दिली.
बरेच दिवस शिर्डीला जायचं होतं पण योग जुळत नव्हता; असं स्नेहलताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दुसऱ्या दिवशी शूटिंग नाही हे कळताच अशोक आणि स्नेहलताने शिर्डी गाठलं.
श्रावणात भाविकांची गर्दी असते. त्यामुळे दर्शन मिळेल की नाही याबाबत त्यांना शंका होती.
पण, अतिशय दोघांनीही व्यवस्थितपणे साईबाबांचं दर्शन घेतलं.