स्मृती आणि पलाश यांचं लवकरच लग्न होणार आहे.
महिला क्रिकेटर स्मृती मंधना आणि प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल यांचं लवकरच लग्न होणार आहे.
दोघेही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची गोष्ट फोटोच्या माध्यमातून उघड मान्य करतात.
स्मृतीची होणारी नणंद पलक मुच्छल हिनेच मुलाखतीत पलाश-स्मृती लवकरच लग्न करणार असल्याचे सांगितलं.
पलक उत्तम गायिका असून तिने प्रेम रतन धन पायो, एमएस धोनी, हिरो, आशिकी २ अशा अनेक चित्रपटात पार्श्वगायक केलं आहे.
ताज्या मुलाखतीत पलकने स्मृती मंधानाशी तिचं नातं कसं आहे, यावरही अतिशय स्पष्टपणे सांगितलं.
स्मृती माझी जवळची मैत्रिण आहे. तिने लहान वयात जे मिळवलंय त्याचा अभिमान वाटतो, असं पलक सांगते.
मैदानात स्मृती उत्तम खेळतेच, पण त्यासोबतच ती घरंदाज मुलगीही आहे, मोठ्यांचा आदर करते, असेही पलकने सांगितले.
पलाश आणि स्मृतीची जोडी खूपच चांगली आहे. आम्हाला त्यांची जोडी खूप आवडते, ते लवकरच लग्न करतील, असेही ती म्हणाली.