टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी आपल्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
वाढत्या वयानुसार श्वेताचं सौंदर्य कमी न होता अधिकच खुलत चाललं आहे.
नुकतेच श्वेताने तिच्या बेडरूममधील काही कॅज्युअल पण ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
श्वेताने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती खूपच आनंदी आणि मजेशीर मूडमध्ये दिसत आहे.
बेडवर विसावलेली श्वेता हातात रमेश मेनन यांचं 'देवी' हे पुस्तक धरून आहे, तर तिच्या समोर बेडवर एक टॅबलेट ठेवलेला दिसत आहे.
हे फोटो शेअर करताना तिने एक हटके कॅप्शन दिलं आहे. श्वेता लिहिते, "थकवणाऱ्या दिवसानंतर रात्रीची दिनचर्या: खा, वाचा, झोपेचे नाटक करा. आणि पुन्हा 'धुरंधर' पाहत आहे".
श्वेताने या पोस्टद्वारे खुलासा केला आहे की, तिला रणवीर सिंगचा 'धुरंधर' हा चित्रपट इतका आवडला आहे की तिने तो दुसऱ्यांदा पाहिला आहे.
श्वेताचे हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिच्या तरुण दिसण्याचं पुन्हा एकदा कौतुक केलं आहे.