शेअर केलं ब्यूटी सिक्रेट
बॉलीवूड आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रुती हसन केवळ तिच्या अभिनयासाठीच नव्हे, तर तिच्या सौंदर्यसाठीही ओळखली जाते.
श्रुती हासनच्या विशेषतः दाट आणि मजबुत केसांचं कौतुक अनेकदा तिचे चाहते करतात.
तिच्या या सुंदर केसांचं गुपित काय आहे, याचा खुलासा तिने नुकताच केला आहे.
श्रुतीने आपल्या केसांसाठी घरगुती उपाय फायदेशीर असल्याचे सांगितले आहे.
प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अल्लाहबादियासोबतच्या पॉडकास्टमध्ये श्रुती हासनने तिच्या केसांची काळजी घेण्याच्या पद्धतीबद्दल सांगितलं.
केसांचा नैसर्गिक टिकवून ठेवण्यासाठी श्रुती बदाम किंवा नारळ तेलात तिळाचे तेल मिसळून केसांना लावते.
श्रुती म्हणाली, की या तेलाने तिच्या केसांवर जादूचा प्रभाव दाखवला आहे. रात्री झोपायच्या आधी किंवा केस धुण्याआधी आपण केसांना हे तेल लावू शकतो.
तीळाच्या तेलात ओमेगा 3 आणि ओमेगा-6 फॅटी अॅसिड असतात जे टाळूचे पोषण आणि केस मजबूत करण्यास मदत करतात. यामुळे केस तुटणे आणि गळणे थांबते.