शिवाली परबचं पाळीव प्राणी प्रेम

खास फोटो चाहत्यांसोबत केले शेअर!

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे अभिनेत्री शिवाली परब घराघरांत लोकप्रिय झाली आहे. 

तिचं सुंदर हसणं आणि दमदार अभिनयाचे लाखो चाहते आहेत.

 विनोदाचं अचूक टायमिंग साधत शिवालीने प्रत्येकाचं मन जिंकून घेतलं आहे. 

आपल्या विनोदी अभिनयाने चर्चेत राहणारी शिवाली सोशल मीडियावरही तितकीच चर्चेत राहत असते.

अशातच शिवाली परबने शेअर केलेले फोटो सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.

शिवालीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये तिच्याबरोबर पाळीव कुत्रे दिसत आहेत.

या फोटोंना "Too much cuteness to handle", असं फोटो कॅप्शन तिने दिलं आहे.

यामध्ये शिवाली त्यांच्यासोबत मस्ती करताना दिसतेय. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय. 

Click Here