काळ्या साडीमध्ये केलं फोटोशूट
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे शिवाली परब हे नाव घराघरात पोहोचलं.
शिवाली सोशल मीडियावर बऱ्याचदा चर्चेत येत असते.
नुकतंच शिवाली परबने तिचा एक सुंदर लूक शेअर केलाय.
या फोटोशूटमध्ये तिने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
यावेळी शिवालीने टिकली लावून तिचा लुक पूर्ण केला. गळ्यात नाजूकशी गोल्डन चेन घातली आहे.
शिवालीचा हा लूक तिच्या चाहत्यांना पसंत पडला आहे.
शिवालीला आपण विविध माध्यमात अभिनय करताना पाहिलंय.
शिवाली परब हास्यजत्रेत विविध कॅरेक्टर्स साकारुन प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसते.