तुम्हीदेखील लग्नात अभिनेत्री श्रेया बुगडेसारखा लूक करत सुंदर दिसू शकता.
सध्या वेडिंग सीझन सुरू झाला आहे. लग्नात सुंदर लूक करत अभिनेत्रींसारखं छान दिसावं असं सगळ्यांनाच वाटतं.
श्रेयाने नुकतंच तिच्या फॅमिलीमधील एका लग्नासाठी खास लूक केला होता. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
श्रेयाने लाल रंगाची पैठणी साडी आणि त्यावर V नेक ब्लाऊज घातला आहे.
केसांचा बन बांधत त्यावर गजरा माळला आहे. अगदी साधा मेकअप तिने केला आहे.
कानात झुमके, नाकात नथ आणि गळ्यात ठुशी असा साजशृंगार अभिनेत्रीने केला आहे.
लग्नसमारंभात श्रेयासारखा पारंपरिक लूक तुम्हीदेखील ट्राय करू शकता.