लग्झरी कार, मुंबईत आलिशान घर आहे.
'बिग बॉस १३'मधून प्रसिद्ध झालेली शहनाझ गिल ही स्टार अभिनेत्री आहे.
शहनाझ गिलचा चाहतावर्ग मोठा आहे. तिच्या निरागस स्वभावाने तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
तिचा नुकताच ३१ ऑक्टोबर रोजी पंजाबी भाषेतील चित्रपट 'इक्क कुडी' प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारण्यासोबतच निर्माती म्हणूनही पदार्पण केलं.
या चित्रपटाच्या निमित्तानं ती चर्चेत आली आहे. शहनाझ निर्माती झाल्यानं तिची नेमकी कमाई किती याचा प्रश्न अनेकांना पडला आहे.
शहनाझने काही म्युझिक व्हिडीओमध्ये काम केले आहे. तसेच ती काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे.
शहनाझ ही ब्रँड एन्डोर्समेंटमधूनही चांगली कमाई करते. तर, युट्युबवरही तिचे एक चॅनेल आहे. तिच्याकडे लग्झरी कार आहेत. तसेच तिचे मुंबईत आलिशान घरदेखील आहे.
शहनाझ गिलची एकूण संपत्ती ही ३३ कोटी रुपये आहे. वार्षिक उत्पन्न हे तीन कोटींच्या घरात असून मासिक उत्पन्न २५ लाख रुपये आहे.