लेटेस्ट फोटोशूटमध्ये शहनाज गिल दिसली कमालीची सुंदर
अभिनेत्री शहनाज गिल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
शहनाजने नुकतेच तिचे एक सुंदर फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे.
या फोटोंमध्ये शहनाजचा लूक पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.
शहनाजने फोटो शेअर करताच अवघ्या काही मिनिटांत त्यावर लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे
शहनाज गिल आता केवळ एक टीव्ही स्टार राहिलेली नाही, तर तिने बॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे.
सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' आणि भूमी पेडणेकरसोबत 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटांनंतर तिचे नाव आता अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सशी जोडले जात आहे.
अलिकडेच तिचा 'इक कुडी' सिनेमा रिलीज झाला होता.