गौरवच्या या केसांचं रहस्य काय? आणि झुपकेदार केसांसाठी तो काय करतो?
फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून ओळख मिळवलेला गौरव मोरे हा उत्तम नट आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून तो घराघरात पोहोचला.
गौरवच्या विनोदासोबतच चर्चा होते ती त्याच्या झुपकेदार केसांची. एखाद्या मुलीलाही हेवा वाटेल असे त्याचे केस आहेत.
पण, गौरवच्या या केसांचं रहस्य काय? आणि झुपकेदार केसांसाठी तो काय करतो?
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत गौरवने याचा उलगडा केला.
गौरव म्हणाला की माझं माझ्यापेक्षा जास्त केसांवर प्रेम आहे. केस तुटतात तेव्हा मी नाराज होतो.
मी केसांसाठी फार विशेष काही करत नाही. पण मी त्यांची काळजी घेतो.
नियमित सलूनला जाणं किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं हे मी करतो.