निसर्गरम्य ठिकाणी फोटोशूट
मराठमोळी अभिनेत्री सायली पाटीलने नुकतंच एक हटके फोटोशूट केलं आहे.
अगदी क्लासी लूकमध्ये तिनं हे फोटोशूट केलं असून यात ती कमालीची सुंदर दिसतेय.
पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये ती अगदी निसर्गरम्य ठिकाणी आहे. पण, हे ठिकाण कुठे आहे, ते मात्र सायलीने सांगितले नाही.
सायली आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेताना दिसतेय.
सायलीला विविध ठिकाणी फिरण्याची आवड आहे, ती भटकंतीचे फोटो शेअर करत असते.
सायली पाटीलने नागराज मंजुळे यांच्या झुंड, घर बंदुक बिर्याणी या चित्रपटात काम केलं आहे.
तर अलीकडेच रिलीज झालेल्या येक नंबर या चित्रपटातही ती दिसली.