सायली संजीवचा अस्सल मराठी साज! 

देखणं रूप पाहून चाहते घायाळ

काहे दिया परदेस मालिकेतून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. 

सायली सोशल मीडियावर चाहत्यांच्या कायम संपर्कात असते.

अशातच सायली संजीव हिने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या पारंपारिक लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत. 

सायलीने गडद हिरव्या रंगाची पैठणी साडी नेसली. ज्यामध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ आणि पारंपरिक दागिन्यांनी सजलेली सायली एखाद्या अप्सरेसारखी भासत आहे.

 तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून काही तासांतच यावर लाईक्सचा वर्षाव झाला आहे.

हे फोटो शेअर करताना सायलीने आपल्या चाहत्यांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. 

सायलीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती नुकतीच दोन मराठी सिनेमांमध्ये झळकली. यापैकी एका सिनेमात तिची जोडी शशांक केतकरसोबत जमली होती.

Click Here