वीणा 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
वीणा जगताप हा मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे. 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली.
'बिग बॉस मराठी'मध्येही ती सहभागी झाली होती. वीणा तेव्हा प्रसिद्धीझोतात आली होती.
सध्या वीणा 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
वीणा साकारत असलेल्या ऐश्वर्या या भूमिकेलाही चाहत्यांची पसंती मिळत आहे.
वीणा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं.
अनेकदा ती ग्लॅमरस लूकमधील फोटोही शेअर करत असते.
नुकतंच वीणाने शेअर केलेल्या पिवळ्या साडीतील फोटोंमध्ये ती सुंदर दिसत आहे.