अभिनेत्रीला कॉलेजमध्ये असताना वाटायची रोमान्सची भीती, म्हणाली…
सरगून मेहता ही पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे.
ती तिच्या व्यावसायिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत असते.
सरगूनने आपलं करिअर हिंदी टेलिव्हिजनवरुन सुरू केलं. ती "१२/२४ करोल बाग" या मालिकेतून प्रसिद्ध झाली.
"१२/२४ करोल बाग" या मालिकेनंतर सरगुननं 'बालिका वधू' आणि कपिल शर्मासोबत 'कॉमेडी सर्कस'मध्ये काम केलं.
यानंतर सुरू झाला तो पंजाबी सिनेइंडस्ट्रीतला प्रवास. तिने अनेक हीट चित्रपट दिले. आज तिला पंजाबी चित्रपटांची क्वीन म्हणूनही ओळखलं जातं.
सरगुन मेहता आता फक्त अभिनेत्रीच नाही तर निर्माती झाली आहे. तिनं पती रवी दुबेसोबत मिळून अनेक शो आणि म्युझिक अल्बमही तिने प्रोड्यूस केले
तुम्हाला माहितेय कॉलेजमध्ये शिकत असताना अभिनेत्रीला रोमान्सची भीती वाटत होती. तेव्हा सरगुनला वाटायचं की किस केल्याने मूल होऊ शकतं.
सरगुन मेहताने एका मुलाखतीत सांगितले होते की, कॉलेजला जाईपर्यंत तिला डेटिंग आणि सेक्सबद्दल काहीच महिती नव्हती.