सान्या मल्होत्राचं नवं फोटोशूट होतंय व्हायरल
बॉलिवूडची 'दंगल गर्ल' अर्थात सान्या मल्होत्रा आपल्या अभिनयासोबतच आपल्या अनोख्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.
नुकतंच सान्याने तिचं एक नवं फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
तिच्या या 'देसी' आणि 'ब्युटीफुल' लूकवर सध्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
या फोटोशूटमध्ये सान्याने अत्यंत स्टायलिश आणि ग्लॅमरस अशी पांढऱ्या रंगाची साडी परिधान केला आहे.
तिने आपल्या कुरळ्या केसांची सिग्नेचर स्टाईल कायम ठेवत, कॅमेऱ्यासमोर अतिशय कॉन्फिडंट पोझेस दिल्या आहेत.
तिचा हा अवतार पाहून तिने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की, ती केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही, तर एक खरी फॅशन आयकॉन देखील आहे.
सान्या मल्होत्रा सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि तिचे डान्स व्हिडीओ तसेच वर्कआउट व्हिडीओ देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.