अनाया बांगर इन्स्टाग्रामवर फॉलोअर्सकडून ४८० रुपये घेते, पण का?
कमाईची अनोखी पद्धत, जाणून घ्या...
अनाया बांगर दररोज कोणत्या कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. अनाया बांगर ही माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगरची मुलगी आहे.
खरं तर, अनायाला पूर्वी आर्यन बांगर म्हणून ओळखले जात असे. पण, लिंगबदल शस्त्रक्रिया करून मुलगी झाली. आता तिने अनया बांगर अशी नवी ओळख घेतली.
अनाया बांगर सोशल मीडियावर सक्रीय असते. ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक लहान-मोठे अपडेच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते.
अनायाचे इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मवर ४.३ लाख फॉलोअर्स आहेत. या फॉलोअर्सकडून ती ४८० रुपये शुल्क आकारते.
अनायाने इन्स्टाग्रामवर प्रीमियम सबस्क्रिप्शन सुरू केले आहे, ज्यासाठी कुणीही ४८० रुपये शुल्क भरुन सदस्य होऊ शकतो.
या सबस्क्रिप्शनमध्ये, अनाया तिच्या चाहत्यांसोबत एक्सक्लुझिव्ह कंटेंट शेअर करते. जे उर्वरित फॉलोअर्सना दिसत नाही.
लिंगबदलानंतर अनाया प्रचंड सुंदर दिसते. अनाया आता चाहत्यांना फॅशन गोल्स देखील देत असते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
लिंगबदलाआधी ती लहानपणापासून क्रिकेट खेळायची. तिला हा खेळ तिचे वडील संजय बांगर यांच्याकडून शिकायला मिळाला.
आता मुलगा ते मुलगी हा प्रवास केल्यानंतर तिचे क्रिकेटवरील प्रेम कमी झालेले नाही. आजही ती जेव्हा बॅट हातात घेते, तेव्हा ती धुवाँधार फलंदाजी करताना दिसते.